अपस्माराबद्दल

अपस्माराबद्दल माहिती आणि जागरूकता

भारतातील अपस्मार: स्थिती, अपमानाची भावना आणि गौरसमज याबद्दल समजून घेऊया

अपस्माराचा परिचय

अपस्मार हा मेंदूशी संबंधित एक न्यूरोलॉजिकल विकार आहे, ज्यामध्ये मेंदूतील असामान्य विद्युत क्रियेमुळे वारंवार झटके येतात. जगभरात सुमारे ५० दशलक्ष लोक अपस्माराने ग्रस्त आहेत. अपस्माराबद्दल समजून घेणे म्हणजे हे जाणून घेणे की हा विकार सर्व वयोगटांतील आणि पार्श्वभूमीतील लोकांना प्रभावित करतो. भारतात अंदाजे १.२ कोटी लोक अपस्माराने ग्रस्त आहेत. ही एक अत्यंत सामान्य न्यूरोलॉजिकल समस्या असली तरी अपस्माराविषयी समाजात मोठ्या प्रमाणात गैरसमज आहेत तसेच यामुळे सामाजिक अपमानाची भावना आणि भेदभाव निर्माण होतो. भारतात दर १००० व्यक्तींमध्ये ५ ते १० लोक अपस्माराने ग्रस्त आहेत. अँटी-एपिलेप्टिक औषधांविषयी अज्ञान, गरिबी, सांस्कृतिक समजुती, सामाजिक अपमानाची भावना, आरोग्य सुविधांची कमतरता आणि प्रशिक्षित तज्ज्ञांची अनुपलब्धता यामुळे उपचारांमध्ये मोठी दरी निर्माण होते. संसर्गजन्य आजारामुळे फेफरे येण्याची समस्या वाढते आणि नव्याने अपमस्मार होणे व स्टेटस एपिलेप्टिकस सारखे दीर्घकालीन ओझे निर्माण होते. योग्य शिक्षण आणि आरोग्य सेवा भारतासारख्या देशात मोठा बदल घडवू शकतात.

अपस्माराबद्दल समजून घेऊया

अपस्माराचे झटके विविध प्रकारे येऊ शकतात. काही वेळा क्षणिक बेशुद्धता, अनियंत्रित शारीरिक झटके किंवा गोंधळ आणि दिशाभूल झाल्यासारखे वाटणे यासारखे लक्षणे दिसून येतात. आनुवंशिकता, डोक्याला इजा, संसर्ग किंवा विकासात्मक विकार अशी अपस्माराची विविध कारणे असू शकतात. अपस्माराचे निदान करण्यासाठी रुग्णाचा सविस्तर वैद्यकीय इतिहास, न्यूरोलॉजिकल तपासणी आणि ईईजी (इलेक्ट्रोएन्सेफॅलोग्राम) किंवा एमआरआय (मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग) यांसारख्या चाचण्या आवश्यक असतात.

अपस्मारामुळे निर्माण होणारी अमपानाची भावना

भारतामध्ये अपस्माराशी संबंधित सामाजिक अपमानाची भावना अत्यंत खोलवर आणि व्यापकपणे पसरलेली आहे. ही अपमानाची भावना सांस्कृतिक समजुती, गैरसमज आणि आजाराविषयीच्या अज्ञानातून निर्माण होते. अपस्मार असलेल्या व्यक्तींना अनेकदा सामाजिक बहिष्कार, शिक्षण व रोजगारात भेदभाव, आणि कुटुंब व समाजाकडून नकारात्मक वागणूक सहन करावी लागते.

  1. सांस्कृतिक समजुती: भारताच्या अनेक भागांमध्ये अपस्माराडे अंधश्रद्धा आणि भीतीच्या नजरेतून पाहिले जाते. काही लोक अपस्मार ही भूतबाधा आहे किंवा पूर्वजन्मातील पापांचे फळ आहे असे मानतात. अशा समजुतींमुळे अपस्मार असलेल्या व्यक्तींना त्यांच्या समाजातून वेगळं केलं जातं, त्यांना बहिष्कृत केले जाते.

  2. कौटुंबिक वातावरण: काही कुटुंबांना अपस्मार असलेल्या सदस्याबद्दल लाज वाटते, ज्यामुळे ती व्यक्ती एकटेपणाने ग्रस्त होते. पालक आपल्या अपस्मारग्रस्त मुलांचे विवाह ठरवताना संकोच करतात, कारण त्यांच्या या आजाराशी संबंधित सामाजिक अपमानाची भीती वाटते.

  3. रोजगार आणि शिक्षणावर परिणाम:अपस्मार असलेल्या अनेक व्यक्तींना नोकरी किंवा शिक्षणाच्या संधी मिळवताना भेदभावाचा सामना करावा लागतो. काही कंपनीचे मालक अपस्माराविषयी चुकीच्या समजुती बाळगतात-म्हणजे, अशा कर्मचाऱ्यांना वारंवार रजा घ्यावी लागेल किंवा ते कार्यस्थळी सुरक्षेबाबत धोकादायक ठरतील अशी भीती बाळगतात.

अपस्माराविषयी सामान्य गैरसमज

अपास्माराबद्दलच्या अपमानाच्या भावनेमुळे बहुतेकदा गैरसमज आणि चुकीच्या समजुती वाढतात. भारतात प्रचलित काही गैरसमज पुढीलप्रमाणे आहेत:

  1. गैरसमज: अपस्मार हा मानसिक आजार आहे.
    वास्तविकता: अपस्मार हा न्यूरोलॉजिकल विकार आहे. तो मानसिक आजार नाही. जरी काही वेळा मानसिक आरोग्याच्या समस्यांसोबत हा विकार होऊ शकतो, मात्र अपस्मार हा प्रामुख्याने मेंदूच्या कार्यात होणाऱ्या शारीरिक बदलांमुळे होतो.
  2. गैरसमज: अपस्मार असलेल्या व्यक्ती सामान्य जीवन जगू शकत नाहीत.
    वास्तविकता: योग्य उपचार आणि व्यवस्थापनामुळे अनेक अपस्मारग्रस्त व्यक्ती इतरांप्रमाणे यशस्वी कारकीर्द, शिक्षण आणि नातेसंबंध जोपासून समाधानकारक जीवन जगतात.
  3. गैरसमज: अपस्माराचा झटका पाहणे धोकादायक असते आणि ते टाळले पाहिजे.
    वास्तविकता: झटका पाहणे चिंताजनक वाटू शकते, पण बहुतांश झटके जीवघेणे नसतात. आजूबाजूच्या लोकांनी अशा वेळी सुरक्षितपणे मदत कशी करावी हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
  4. गैरसमज: अपस्मार असलेल्या व्यक्तींनी वाहन चालवू नये किंवा यंत्रसामग्री वापरू नये.
    वास्तविकता: वाहन चालवण्याचे नियम प्रदेशानुसार बदलतात आणि व्यक्तीच्या झटक्यांवरील नियंत्रणावर अवलंबून असतात. अनेक अपस्मारग्रस्त व्यक्ती योग्य नियंत्रण मिळवून सुरक्षितपणे वाहन चालवू शकतात.
  5. गैरसमज: अपस्मार संसर्गजन्य आहे.
    वास्तविकता:अपस्मार संसर्गजन्य नाही. हा एका व्यक्तीकडून दुसऱ्याला पसरणारा आजार नाही.

अपमानाची भावना आणि गैरसमजांशी लढण्यासाठी उपाय

भारतात अपस्माराबद्दल अपमानाची भावना आणि चुकीची माहिती रोखण्यासाठी, अनेक धोरणे वापरली जाऊ शकतात: